हार्दिक पटेलच्या गाडीवर अंडी फेकली 

पीटीआय
शुक्रवार, 8 जून 2018

पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याच्या गाडीवर आज अज्ञात व्यक्तींनी अंडी आणि स्लिपर फेकली. किसान क्रांती सेनेच्या बैठकीसाठी हार्दिक येथे आले होते. मध्य प्रदेशात यंदा वर्षाअखेर विधान सभेच्या निवडणुका होत आहेत. 

जबलपूर - पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याच्या गाडीवर आज अज्ञात व्यक्तींनी अंडी आणि स्लिपर फेकली. किसान क्रांती सेनेच्या बैठकीसाठी हार्दिक येथे आले होते. मध्य प्रदेशात यंदा वर्षाअखेर विधान सभेच्या निवडणुका होत आहेत. 

पनगर येथे होणाऱ्या सभेसाठी जात असताना रानीताल भागात भाजपच्या कार्यालयाजवळ काही अज्ञात नागरिकांनी हार्दिकच्या गाडीवर अंडी आणि चपला फेकल्या, असे कॉंग्रेसचे नेते संजय यादव यांनी सांगितले. काही नागरिकांच्या हातात पिस्तूल होते, असा दावा यादव यांनी केला. अधारताल परिसरात पटेल याच्या गाडीवर अंडी आणि चपला फेकण्यात आल्या, असे ते म्हणाले. मात्र या प्रकरणी अद्याप कोणतीही पोलिसात तक्रार करण्यात आली नाही. 

Web Title: Egg thrown at Hardik Patels car in Jabalpur city