

Egypt’s Strategic Importance: Gateway Between Africa and Asia
sakal
भारत आणि इजिप्त यांच्यातील संबंध अधिक वेगाने विकसित होत आहेत. आफ्रिका, पश्चिम आशिया आणि युरोपला जोडणाऱ्या भौगोलिक स्थानामुळे इजिप्त जागतिक व्यापारातील अत्यंत महत्त्वाचा देश आहे. सुएझ कालव्यामुळे जागतिक सागरी व्यापारात इजिप्तची भूमिका निर्णायक आहे. प्राचीन संस्कृती, अरब जगतातील प्रभाव आणि संरक्षण, ऊर्जा, कृषी व पायाभूत सुविधा क्षेत्रातील वाढते सहकार्य यामुळे भारतासाठी इजिप्त हा महत्त्वाचा भागीदार ठरत आहे. अलिप्ततावादी चळवळीपासून दोन्ही देशांमधील संबंध घनिष्ट राहिले आहेत.