Happy Eid-ul-Adha 2020 : बकरी ईद उत्सव साजरा करण्यामागचे कारण तुम्हाला माहितेय?

टीम ई-सकाळ
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

इस्लाम धर्मियांच्या मान्यतेनुसार, पैगंबर हजरत इब्राहिम यांच्या काळापासूनच  कुर्बानी देण्याची प्रथा सुरू झाली.

बकरी ईद (Happy Eid-ul-Adha 2020) हा मुस्लिम बांधवांचा एक प्रमुख सण आहे. यावर्षी भारतात 1 ऑगस्ट या दिवशी हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. ईद-उल-अजहा, ईद-उल-जुहा किंवा  बकरी ईद (Bakra Eid) या नावाने हा सण ओळखला जातो. रमजान ईदनंतर जवळपास 70 दिवसानंतर हा सण साजरा करण्यात येतो.  

देशी बनावटीचे ‘नमस्ते भारत’​

जाणून घ्या बकरी ईदच्या  दिवशी कुर्बानीचं महत्व

इस्लाम धर्मियांच्या मान्यतेनुसार, पैगंबर हजरत इब्राहिम यांच्या काळापासूनच  कुर्बानी देण्याची प्रथा सुरू झाली. मुस्लीम धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या अल्लाहने धर्मगुरु पैगंबर इब्राहिम यांना श्रद्धा आणि विश्वास सिद्ध करण्यासाठी सर्वात प्रिय वस्तूचा त्याग करण्यास सांगितले होते. यावेळी पैगंबर इब्राहिम यांनी आपल्या एकुलत्या एक मुलाचा बळी देण्याचा निर्णय घेतला होता, अशी अख्यायिका आहे. यावेळी अल्लाहने आपल्या दूताकरवी पैगंबर इब्राहिम यांचा मुलगा आणि बकऱ्याची अदलाबदल केली. तेव्हापासूनच पैगंबर इब्राहिम यांच्या श्रद्धेची आठवण म्हणून बकरी ईद हा उत्सव साजरा करण्यात येतो. या दिवशी नर बकऱ्याचा बळी दिला जातो.  नातेवाईक आणि मित्रमंडळी, गरीब आणि गरजू व्यक्ती तसेच कुटुंबियांसाठी तीन वेगवेगळे वाटे केले जातात.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप       

रमजान ईद आणि बकरी ईद यात फरक काय
इस्लामी वर्षांत दोन ईद साजरे होतात. यातील एक ईद-उल-जुहा आणि दुसरा ईद-उल-फितर।  ईद-उल-फित म्हणजेच रमजान ईदला मीठी ईद देखील संबोधले जाते. रमजानचे सोडताना हा उत्सव साजरा करण्यात येतो. तर बकरी ईद हज यात्रेच्या समाप्तीनंतर साजरा करण्यात येतो.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eid ul adha 2020 when will be bakrid celebrated know here bakra eid significance