नदीत आंघोळीसाठी गेलेल्या आईनं आपल्या मुलीला साबण आणायला पाठवलं अन् नराधमानं तिच्यावर.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Giridih District Jharkhand

बिरनी ब्लॉक प्रमुखाच्या पतीवर आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

नदीत आंघोळीसाठी गेलेल्या आईनं आपल्या मुलीला साबण आणायला पाठवलं अन् नराधमानं तिच्यावर..

झारखंड : गिरिडीह जिल्ह्यामधील (Giridih District Jharkhand) बिरनी पोलीस स्टेशन (Birni Police Station) परिसरातील बिरनी ब्लॉक प्रमुखाच्या पतीवर आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही घटना गुरुवारी घडल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. बिरनी ब्लॉकमधील रहिवासी असलेल्या पीडितेला धनबादमधील शहीद निर्मल महतो वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात (SNMMCH) दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती स्थिर आहे.

बिरनी ब्लॉक प्रमुखाच्या पतीनं मुलीचा विनयभंग केला होता. त्यानंतर पीडितेला गंभीर अवस्थेत गिरिडीहच्या सदर हॉस्पिटलमध्ये (Giridih Hospital) दाखल करण्यात आलं. तेथून तिची प्रकृती बिघडल्यानं तिला गुरुवारी SNMMCH मध्ये दाखल करण्यात आलं. पोलिसांनी सांगितलं की, गिरिडीहच्या बिरनी ब्लॉकच्या प्रमुख कांचन देवी यांचा पती मिंकू मंडल (Minku Mandal) असं आरोपीचं नाव आहे.

हेही वाचा: 'भाजपशासित राज्यात सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी महिलांना कुणासोबत तरी झोपावं लागतं'

पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं की, त्यांची मुलगी आईसोबत नदीत आंघोळीसाठी गेली होती आणि यावेळी कांचन देवीही त्यांच्यासोबत होती. फिर्यादीनुसार, कांचन देवी घरातून साबण घ्यायला विसरल्या होत्या. म्हणून, त्यांनी मुलीला साबण आणण्यासाठी त्यांच्या घरी पाठवलं. घरी पोहोचल्यावर मिंकू मंडल यानं मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर मुलगी कशीबशी नदीवर पोहोचली आणि या घटनेची माहिती आईला दिली. यानंतर ही संपूर्ण हकीकत मुलीच्या आईनं पोलिसांना सांगितली. एसएनएमसीएचचे अधीक्षक अरुण बर्नवाल यांनी सांगितलं की, मुलीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती आता स्थिर आहे. मिंकू मंडल हा फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

हेही वाचा: चेन्नई विमानतळावरून 100 कोटींचं हेरॉईन, कोकेन जप्त; सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई

Web Title: Eight Year Old Girl Raped In Giridih Jharkhand Birni Police Station

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JharkhandCrime News