मोटारीमध्ये आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

वृत्तसंस्था
शनिवार, 22 एप्रिल 2017

कोलकताः शहरातील दक्षिणेकडील भागामध्ये एका मोटारीत आठ वर्षाच्या मुलीवर कॅब चालकाने बलात्कार केल्याची घटना घडली. बलात्कार करणाऱयाला घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (शनिवार) दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालीगंज भागामध्ये रहात असलेली मुलगी आपल्या घरासमोर शुक्रवारी (ता. 21) सकाळी साडेसातच्या सुमारास खेळत होती. तिच्या घराशेजारीच रहात असलेल्या कॅब चालकाने तिला चॉकलेटचे आमीष दाखवून मोटारीमध्ये बोलावले. मोटार बाजूला नेऊन त्याने मोटारीतच तिच्यावर बलात्कार केला. मुलगी मोठ-मोठ्याने ओरडत होती. यावेळी गस्तीवर असलेले पोलिस ओरडण्याचा आवाज ऐकून थांबले. मोटारीमध्ये पाहिले असता बलात्कार होत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला घटनास्थळवरून ताब्यात घेतले आहे.

मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. अहवाल हाती आला असून, त्यामध्ये बलात्कार झाल्याचे आढळून आले आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Eight-year-old girl raped inside cab