

Eknath Shinde Delhi Visit Shiv Sena Cabinet Berth
esakal
Union Cabinet Expansion : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग आला असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अलीकडील दिल्ली दौऱ्यानंतर आता शिंदे यांच्या भेटीगाठींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत ते चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत असून, संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.