Eknath Shinde: राज्यात पूरस्थितीचे संकट मोठे, शेतकऱ्यांना मदत करताना सरकार हात आखडता घेणार नाही; एकनाथ शिंदेंची ग्वाही

Eknath Shinde On Maharashtra Floods : एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यातील संपूर्ण नुकसानीचे आकडे पुढील दोन-तीन दिवसांत येतील. यानंतर मुख्यमंत्र्यासोबत बैठक घेऊन आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घेऊ.
Deputy CM Eknath Shinde addresses media after cabinet meeting, assuring Maharashtra farmers of flood relief, crop loss compensation, and government support.

Deputy CM Eknath Shinde addresses media after cabinet meeting, assuring Maharashtra farmers of flood relief, crop loss compensation, and government support.

sakal

Updated on

Summary

  1. केंद्र सरकारलाही नुकसानीबाबत निवेदन देण्यात आले असून मदत दिली जात आहे.

  2. पूरग्रस्त भागात स्वच्छता, आरोग्य शिबिरं आणि मेडिकल टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

  3. दसरा मेळावा होणार पण पूरग्रस्तांना मदत प्राधान्याने करावी अशी शिवसैनिकांना सूचना.

राज्यात पूरस्थितीचे संकट मोठे आहे, अतिवृष्टीमुळे आतापर्यंत सुमारे ६० लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. पुढील दोन तीन दिवसांत संपूर्ण नुकसानीचे प्रमाण आणि आकडे समोर येतील. यावेळी आम्ही मुख्यमंत्र्योसोबत बैठक घेऊन राज्यातील शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घेऊ. शेतकऱ्यांना मदत देताना सरकार हात आखडता घेणार नाही. अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com