

Eknath Shinde faction's MLA disqualification case being heard in the Supreme Court amid the Shiv Sena political dispute
esakal
शिवसेनेतील सत्तासंघर्षाच्या प्रकरणात एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा पुन्हा सर्वोच्च न्यायालयात चर्चेत आला आहे. केवळ विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने एखाद्या आमदाराने राजकीय पक्षाचे सदस्यत्व स्वेच्छेने सोडले, असे मानता येणार नाही. त्यामुळे केवळ बैठकीला उपस्थित न राहिल्याच्या कारणावरून आमदारांना अपात्र ठरवता येत नाही, असा महत्त्वपूर्ण युक्तिवाद एकनाथ शिंदे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील ध्रुव मेहता यांनी केला. दहाव्या अनुसूचीनुसार पक्षाचे सदस्यत्व सोडणे आणि विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहणे या दोन वेगळ्या बाबी असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.