El Nino 2027 Forecast
esakal
भारतासह संपूर्ण जगासाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. ब्रिटनच्या हवामान विभागाने जारी केलेल्या अहवालानुसार यंदा ‘एल निनो’ अत्यंत तीव्र रूप धारण करण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम पुढील वर्षी जागतिक तापमानावर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, असं या अहवालात सांगण्यात आलं आहे. त्यामुळे हवामान तज्ज्ञांची चिंता वाढली आहे. हा एल निनो गेल्या शंभर वर्षांतील सर्वात शक्तिशाली घटनांपैकी एक ठरू शकतो, असा अंदाज या अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे.