

Old Age Home Father Dies Daughters Ask for Video Call
Esakal
तीन मुलींना शिकवून त्यांच्या पायावर उभा केलं. मात्र वृद्धापकाळात त्यांनीच वडिलांना दूर लोटलं. वृद्धाश्रमात राहण्याची वेळ आली आणि तिथंच मुलींची वाट बघत वडिलांनी प्राण सोडले. त्यांच्यावर अंत्यसंस्काराला येण्यासाठीही मुलींना वेळ नव्हता. वृद्धाश्रम संचालकांनी फोन केल्यावर त्यांना ५१०० रुपये पाठवले आणि अंत्यसंस्कार उरकून घ्या असं सांगण्यात आलं. वडिलांच्या अस्थी नेण्यासाठीही मुली आल्या नाहीत. सोनीपतच्या शिवचरण गुप्ता यांच्यावर अंत्यसंस्कार आणि अस्थी विसर्जनाची जबाबदारी वृद्धाश्रमानेच पार पाडली.