Mother Dies in Old Age Home Son Refuses Body Over Wedding Rituals
Esakal
देश
घरी लग्नकार्य, ४ दिवसांनी अंत्यसंस्कार करायचे; वृद्धाश्रमात निधन झालेल्या आईचा मृतदेह थोरल्या लेकानं पुरून ठेवला
आईचं वृद्धाश्रमात निधन झाल्यानंतर मोठ्या मुलानं घरात लग्नकार्य आहे आणि मृतदेह आणला तर अपशकून होईल असं सांगताच वृद्धाश्रम चालवणाऱ्यांना धक्काच बसला. शेवटी मुलानं ४ दिवस मृतदेह पुरून ठेवला.
वृद्धाश्रमातील वृद्ध महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांशी संपर्क साधला असता त्यांनी मृतदेह चार दिवस शवागारात ठेवा असं सांगितलं. घरात लग्नकार्य आहे आणि मृतदेह आणला तर अपशकून होईल असं मोठ्या मुलानं सांगताच वृद्धाश्रम चालवणाऱ्यांना धक्काच बसला. उत्तर प्रदेशातील गोरखपूर इथल्या शोभा देवी यांचं आजारपणामुळे निधन झालं. त्यानंतर कुटुंबाशी संपर्क साधून अंत्यसंस्कारासाठी पार्थिव नेण्यास वृद्धाश्रम संचालकांनी सांगितलं होतं. मृतदेह पाठवायला सांगितल्यानंतरही अंत्यसंस्काराऐवजी दफन केल्याचा प्रकार समोर आलाय.

