Supreme Court: पुन्हा ‘फॉर्म ६’ भरल्यास कारवाई नाही; निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

Supreme Court Gets Election Commission Clarification on Form 6: मतदारांसाठी महत्त्वाची बातमी! फॉर्म ६ पुन्हा भरल्यास कारवाई होणार नाही; आयोगाचे स्पष्टीकरण
Form 6 Voter Registration Election Commission Tells Supreme Court No Action Against Those Who Submit Form 6 Again

Form 6 Voter Registration Election Commission Tells Supreme Court No Action Against Those Who Submit Form 6 Again

sakal

Updated on: 

नवी दिल्ली : आधी मतदार म्हणून नोंदणी असलेल्या आणि मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरपडताळणी (एसआयआर) प्रक्रियेत प्रारूप मतदारयादीतून नाव वगळले गेलेल्या मतदारांना निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. अशा नागरिकांनी मतदार यादीत पुन्हा नाव समाविष्ट करण्यासाठी ‘फॉर्म ६’ भरल्यास, केवळ पूर्वी मतदार म्हणून नोंदणी होती या कारणावरून त्यांच्याविरोधात कोणतीही फौजदारी कारवाई केली जाणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे.

Loading content, please wait...