Election Commission : यूपी-बिहारसह 'या' राज्यांतील पोटनिवडणुकांच्या तारखा जाहीर; 8 डिसेंबरला लागणार निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Election Commission

निवडणूक आयोगानं आज पाच राज्यांतील पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत.

Election Commission : यूपी-बिहारसह 'या' राज्यांतील पोटनिवडणुकांच्या तारखा जाहीर; 8 डिसेंबरला लागणार निकाल

Political News : हिमाचल आणि गुजरात विधानसभा निवडणुका (Gujarat Assembly Election) जाहीर झाल्या आहेत. त्यानंतर आता निवडणूक आयोगानं (Election Commission) पाच राज्यांतील पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. या जागांसाठी 5 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर गुजरात आणि हिमाचलसह 8 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.

याशिवाय, ज्या भागात निवडणुका होणार आहेत तिथं आचारसंहिता लागू झाली आहे. समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यामुळं यूपीची मौनपुरी लोकसभा जागा रिक्त झाली. तिथं आता निवडणूक आयोगानं पोटनिवडणुकीची घोषणा केलीय. याशिवाय ओडिशातील पदमपूर, राजस्थानमधील सरदारशहर, बिहारमधील कुधनी, छत्तीसगडमधील भानुप्रतापपूर आणि यूपीमधील रामपूर इथं पोटनिवडणूक होणार आहे.

हेही वाचा: सरन्यायाधीशांसोबत आपली ओळख असल्याचं सांगितलं तर टीका होते; असं का म्हणाले फडणवीस?

संपूर्ण वेळापत्रक पाहा

  • अधिसूचना तारीख – 10 नोव्हेंबर 2022

  • नामांकनाची अंतिम तारीख - 17 नोव्हेंबर 2022

  • नामांकन मागं घेण्याची शेवटची तारीख - 21 नोव्हेंबर 2022

  • मतदानाची तारीख - 5 डिसेंबर 2022

  • मतमोजणीची तारीख - 8 डिसेंबर 2022

हिमाचल-गुजरातमध्ये कधी होणार निवडणुका?

यावेळी हिमाचलमध्ये एका टप्प्यात निवडणुका होत असून त्याअंतर्गत 12 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर दुसरीकडं गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. 5 डिसेंबरला आणखी एक मतदान होत आहे. दोन्ही राज्यांचा निकाल 8 डिसेंबरला लागणार आहे.

हेही वाचा: एका सुफी विचारवंताच्या नजरेतले हिंदुत्व