निवडणुकीसाठी नवी नियमावली; जनसभेस १०००, घरोघरी प्रचाराला २० लोकांना परवानगी

election commission
election commissionElection Commission

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission decision) नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली (New guidelines issued) आहेत. त्यानुसार आता घरोघरी प्रचारासाठी १० ऐवजी २० जणांना परवानगी दिली जाणार आहे. त्याचवेळी इनडोअर मीटिंगमध्ये ३०० ऐवजी ५०० लोक उपस्थित राहू शकतात. कोरोना प्रकरणांमध्ये वाढ होत असताना निवडणूक आयोगाने २२ जानेवारी रोजी फिजिकल रॅली आणि रोड शोवरील बंदी ३१ जानेवारीपर्यंत वाढवली होती. आढावा बैठकीनंतर आयोगाने निवडणूक रॅलींवरील बंदी ११ फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे.

मागील बैठकीत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी रॅलीला परवानगी दिली होती. आयोगाने २२ जानेवारी रोजी राजकीय पक्षांच्या किंवा उमेदवारांच्या प्रत्यक्ष सार्वजनिक सभांना २८ जानेवारीपासून आणि दुसऱ्या टप्प्यासाठी १ फेब्रुवारीपासून परवानगी दिली होती. त्यानुसार ५०० ऐवजी १,००० लोकांच्या मेळाव्यास परवानगी दिली (New guidelines issued) जाईल.

election commission
मटण खाल्ल्यानंतर हे पदार्थ खाणे टाळा; अन्यथा या परिणामांना तयार राहा

यापूर्वी घरोघरी प्रचारासाठी पाच व्यक्तींची मर्यादा १० व्यक्तींपर्यंत वाढवण्यात आली होती. ज्यामध्ये सुरक्षा कर्मचारी आणि व्हिडिओ व्हॅन कोविड निर्बंधांसह नियुक्त केलेल्या मोकळ्या जागांवर प्रचारासाठी वगळण्यात आले होते. जी आता २० करण्यात आली आहे. १० फेब्रुवारी ते ७ मार्च दरम्यान उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका (Assembly election) होणार आहेत. १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

प्रतिबंधित स्वरूपात थेट प्रचार करण्याची संधी

निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना आभासी प्रचारावर भर देण्यास सांगितले होते. अशा परिस्थितीत आयोगाकडून कोरोनाच्या परिस्थितीचा नियमित आढावा घेतला जात आहे. आयोग कोरोना विषाणूचा प्रसार होणार नाही याची काळजी घेत आहे. तसेच राजकीय पक्षांना देखील प्रतिबंधित स्वरूपात थेट प्रचार करण्याची संधी दिली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com