निवडणूक आयोगाची कमलनाथ यांना नोटीस

kamalnath
kamalnath

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाच्या नेत्या इमरती देवी यांना उद्देशून आयटेम असा अपशब्द उच्चारल्याबद्दल 48 तासांच्या आत खुलासा करावा अशी नोटीस निवडणूक आयोगाने बुधवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमल नाथ यांना बजावली. आयोगाने आदर्श आचारसंहितेचा उल्लेख केला आहे.

मध्य प्रदेशातील पोटनिवडमूकीसाठी ती लागू असून त्यानुसार कोणताही पक्ष सध्या अस्तित्वात असलेले मतभेद वाढतील असे कोणतेही कृत्य करणार नाही, द्वेषाचे वातावरण निर्माण करणार नाही, विविध जाती-जमातींमध्ये तेढ व तणाव निर्माण करणार नाही असे अपेक्षित आहे. रविवारी ग्वाल्हेरजवळील डबरा गावातील उमेदवार इमरती यांच्याबाबत कमल नाथ यांनी हे भाष्य केले होते. काँग्रेसचा उमेदवार साधी व्यक्ती आहे, तर इमरती या आयटेम आहेत, असे ते म्हणाले होते. याबद्दल राष्ट्रीय महिला आयोगानेही कमल नाथ यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे.

दरम्यान, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने ग्वाल्हेर आणि दतिया येथील जिल्हा दंडाधिकाऱ्यांना केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि कमल नाथ यांच्याविरुद्ध कोरोना निर्बंधांच्या उल्लंघनाबद्दल प्राथमिक चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. कार्यवाहीचा अहवाल 23 तारखेपर्यंत सादर करायचा आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com