esakal | Assembly Election: मतमोजणीसाठी EC च्या गाईडलाईन्स जाहीर; उमेदवाराची RT-PCR टेस्ट अनिवार्य

बोलून बातमी शोधा

election commission

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु केली जाणार आहे. यापार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने (Election Commission) सविस्तर गाईडलाईन्स तयार करुन सर्व राज्यांना पाठवल्या आहेत.

Assembly Election: मतमोजणीसाठी EC च्या गाईडलाईन्स जाहीर

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

नवी दिल्ली- पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु केली जाणार आहे. यापार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने (Election Commission) सविस्तर गाईडलाईन्स तयार करुन सर्व राज्यांना पाठवल्या आहेत. गाईडलाईन्सनुसार उमेदवार आणि त्यांच्या एजेंटना मतमोजणीच्या अगोदर कोरोना चाचणी करुन निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणे किंवा लशींचे दोन्ही डोस घेतले असल्याचं सर्टिफिकेट दाखवणे अनिवार्य करण्यात आले आहे. अशाच उमेदवारांना आणि त्यांच्या एजेंटना मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार आहे.तसेच मतमोजणी केंद्राबाहेर लोकांची गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्यास निवडणूक आयोगाने सांगितलं आहे.

प्रोटोकॉलनुसार मतमोजणी होत असलेला हॉल मोठा असेल. मतमोजणीच्या दिवशी उमेदवार आणि त्यांच्या एजेंटना पीपीई कीट उपलब्ध करुन दिली जाईल. याशिवाय हातमोजे, मास्क, सॅनिटायझर, फेस शील्ड मतमोजणीशी संबंधी लोकांना आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहेत. कोरोना रुग्णांची संख्या देशभरात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

हेही वाचा: विजयी रॅलीवर बंदी; न्यायालयानं फटकारल्यानंतर निवडणूक आयोगाला आली जाग

बंगालमध्ये निवडणुका शिल्लक

चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. यापार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने विजयी मिरवणूक काढण्यास बंदी घातली आहे. पश्चिम बंगालच्या आठव्या टप्प्यातील मतदान असून शिल्लक आहे. 29 एप्रिलला हे मतदान होईल. तमिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुचेरी या राज्यातील मतदान पार पडलं आहे. 2 मे रोजी मतमोजणी होईल.

निवडणूक आयोगाकडून चार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशात म्हटलंय की, देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मतमोजणीच्या दरम्यान कडक नियोजन करणे आवश्यक आहे. 2 मेच्या निकालानंतर विजयी मिरवणुकीवर पूर्णपणे बंदी असेल. तसेच विजयी प्रमाणपत्र घेण्यासाठी आलेल्या उमेदवार त्याच्यासोबत केवळ एका व्यक्तीला घेऊन येऊ शकतो.