निवडणूक आयोगाला दिल्ली उच्च न्यायालयाची नोटीस

वृत्तसंस्था
बुधवार, 19 एप्रिल 2017

जर का, मशिन उपलब्ध नसतील तर, आम्ही या प्रक्रियेत हस्तक्षेप करू शकत नाही. असे न्यायाधीश ए. के. पाठक यांनी नमूद केले

नवी दिल्ली - मतदान पोचपावती मशिनच्या (व्हीव्हीपीएटी) उपलब्धतेविषयी निवडणूक आयोगाकडून माहिती प्राप्त होईपर्यंत आगामी दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत त्याच्या वापरासंदर्भात कोणत्याही सूचना करू शकत नसल्याचे आज दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

याविषयी आज झालेल्या सुनावणीत अंतिम क्षणी ही निवडणूक थांबविण्याविषयी कोणते आदेश पारीत करता येणार नाहीत. जर का, मशिन उपलब्ध नसतील तर, आम्ही या प्रक्रियेत हस्तक्षेप करू शकत नाही. असे न्यायाधीश ए. के. पाठक यांनी नमूद केले. दरम्यान, या प्रकरणी न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस पाठवून म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत.

आम आदमी पक्षाच्या वतीने यासंदर्भात याचिका दाखल करत या निवडणुकीत दुसऱ्या किंवा तिसऱ्या पिढीतील इव्हीएम मशिनचा वापर करावा, अशी मागणी केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 एप्रिलला होणार आहे.

Web Title: Election Commission noticed by High Court