esakal | लोजपाचं निवडणूक चिन्ह स्थगित; 'या' कारणामुळे निवडणूक आयोगाची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

लोजपाचं निवडणूक चिन्ह स्थगित; 'या' कारणामुळे निवडणूक आयोगाची कारवाई

लोजपाचं निवडणूक चिन्ह स्थगित; 'या' कारणामुळे निवडणूक आयोगाची कारवाई

sakal_logo
By
विनायक होगाडे

पाटना: लोक जनशक्ती पक्षावर ताबा मिळवण्याबाबत चिराग पासवान आणि पशुपती कुमार पारस यांच्या दरम्यान सध्या रस्सीखेच सुरु आहे. या दरम्यानच आता निवडणूक आयोगाने लोजपावर मोठी कारवाई केली आहे. निवडणूक आयोगाने लोक जनशक्ती पार्टीचे निवडणूक चिन्हच स्थगित केलं आहे.

हेही वाचा: VIDEO: जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज; लेहमध्ये तिरंग्याचं अनावरण

निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की, पशुपती पारस यांचा गट असो वा चिराग पासवान यांचा गट असो, कुणालाही निवडणूक चिन्हाचा वापर करण्याची परवानगी दिली जाणार नाही. आयोगाने म्हटलंय की, तात्पुरता उपाय म्हणून आयोगाने दोघांनाही त्यांच्या गटाचे नाव आणि चिन्ह निवडण्यास सांगितले आहे, ज्याचं उमेदवारांना नंतर वाटप केलं जाऊ शकतं.

रामविलास पासवान यांच्या निधनानंतर पक्षामध्ये अंतर्गत कलह सुरु झाले आहेत. 16 जून रोजी चिराग पासवान यांच्या गैरहजेरीमध्ये पाच खासदारांनी संसदीय बोर्डाची बैठक बोलावण्यात आली होती तसेच हाजीपूरचे खासदार पशुपती पारस यांना संसदीय बोर्डाचा नवा अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं होतं. याची माहिती लोकसभा स्पीकरना देखील देण्यात आली होती. तसेच त्याच्या पुढच्याच दिवशी लोकसभा सचिवालयातून त्यास मान्यता देखील मिळाली होती.

हेही वाचा: लग्नाच्या चार वर्षांनंतर समंथा-नाग चैतन्यने जाहीर केला घटस्फोट

17 व्या लोकसभेमध्ये लोजपाचे एकूण सहा खासदार आहेत. यामध्ये पाच खासदारांनी पशुपती कुमार पारस, चौधरी महबूब अली कैसर, वीणा देवी, चंदन सिंह आणि प्रिंस राज यांनी चिराग पासवान यांना पक्षातील सर्व पदांवरुन हाकलून काढलं होतं. त्यानंतर त्यांनी चिराग यांचे काका म्हणजेच पशुपती कुमार पारस यांना आपला नेता म्हणून निवडलं होतं.

loading image
go to top