
VIDEO: जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज; लेहमध्ये तिरंग्याचं अनावरण
लेह: यावर्षी संपूर्ण देश महात्मा गांधींची 152 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा स्पीकर यांच्यासह अनेक नेत्यांनी गांधींच्या समाधी स्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. तिथे एका प्रार्थना सभेचंही आयोजन करण्यात आलं आहे. दुसरीकडे आजच्या दिनाचं औचित्य साधत जगातील सर्वांत मोठ्या राष्ट्रध्वजाचं अनावरण देखील करण्यात आलं आहे.
लेहमध्ये जगातील सर्वांत मोठा खादीचा राष्ट्रीय ध्वज फडकावण्यात आला आहे. लडाखचे उपराज्यपाल आर के माथुर यांनी या ध्वजाचं अनावरण केलं आहे. या प्रसंगी सैन्याचे प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे देखील उपस्थिती होते.
यावेळी लडाखचे उपराज्यपाल आर के माथुर यांनी म्हटलंय की, गांधीजींनी म्हटलंय की, आपला राष्ट्रध्वज हा एकता, मानवतेचं प्रतिक असून देशातील प्रत्येकांनी स्विकारलेले महत्त्वाचे प्रतिक आहे. देशाच्या महानतेचं हा प्रतिक आहे. येत्या काही वर्षांमध्ये हा ध्वज लेहमध्ये आपल्या सैनिकांसाठी उत्साह आणि प्रोत्साहन देणारं महत्त्वाचं ठिकाण असेल.
काय आहेत या ध्वजाची वैशिष्ट्ये?
जगातील सर्वांत मोठा तिरंगा ध्वज
हा ध्वज खादीचा आहे.
हा ध्वज 225 फूट लांबीचा आणि 150 फूट रुंदीचा आहे.
या तिरंग्यांचं वजन 1400 किलो इतकं आहे.
हा ध्वज 37,500 चौरस फूट क्षेत्र व्यापतो
या ध्वजाची निर्मिती करण्यासाठी 49 दिवस लागले
या भारतीय ध्वजाची निर्मिती 57 इंजिनिअर रेजिमेंटने केली आहे.
भारतीय लष्कराच्या 57 इंजिनीअर रेजिमेंटच्या 150 जवानांनी हा खादीचा ध्वज टेकडीच्या शिखरावर नेला. लेह, लडाखमध्ये जमिनीच्या पातळीपासून 2000 फूट उंचीवर एका टेकडीच्या शिखरावर नेण्यासाठी सैन्याला वर पोहोचण्यास दोन तास लागले.