केजरीवालांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचा आदेश

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

वादग्रस्त विधानावरून निवडणूक आयागोची कारवाई

नवी दिल्ली : गोव्यातील निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना भ्रष्टाचाराबाबत केलेल्या वक्तव्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने आज दिला आहे.

वादग्रस्त विधानावरून निवडणूक आयागोची कारवाई

नवी दिल्ली : गोव्यातील निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना भ्रष्टाचाराबाबत केलेल्या वक्तव्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने आज दिला आहे.

विरोधी पक्षांकडून लाच म्हणून पैसे देण्यात आले तर ते घ्या; मात्र, तुमचे मत "आप'लाच द्या, अशा प्रकारचे वादग्रस्त विधान केजरीवाल यांनी 8 जानेवारी रोजी प्रचार सभेत केले होते. तसेच, विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पाच हजार देण्याची तयारी दर्शविल्यास दहा हजारांची मागणी करा आणि ते नव्या नोटांच्या स्वरूपातच घ्या, असे आव्हानही केजरीवाल यांनी मतदारांना केले होते. केजरीवाल यांच्या वक्तव्यांची दखल घेत निवडणूक आयोगाने कारवाईचा इशारा दिला होता. याप्रकरणी प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करून केजरीवाल यांच्या विरोधात काय कायदेशीर कारवाई केली, याचा अहवाल 31 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत सादर करावा, असा आदेशही आयोगाने दिला आहे.

भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे वक्तव्य केल्याबद्दल केजरीवाल यांना खडसावले होते. अशा प्रकारची वक्तव्ये थांबली नाहीत तर "आप'ची मान्यता रद्द करण्याचा इशाराही आयोगाने केजरीवाल यांना दिला होता. मात्र, त्यानंतरही केजरीवाल हे आपल्या मतावर ठाम राहिले होते. केजरीवाल यांनी खुलासा करत स्पष्ट केले होते की, भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे वक्तव्य मी केले नव्हते. उलट भ्रष्टाचार संपविण्यासाठी माझे वक्तव्य उपयोगी ठरू शकते, हे दिल्लीत दिसून आले आहे, असे मत केजरीवाल यांनी मांडले होते.

Web Title: election commission orders to register case against kejriwal