मतदानासाठी गावी जावं लागणार नाही - निवडणूक आयोग

टीम ई सकाळ
Monday, 25 January 2021

मतदानावेळी बाहेरगावी राहणाऱ्यांना त्यांच्या मूळ गावी यावं लागतं. अशावेळी रिमोट वोटिंग प्रोजेक्ट फायदाचा ठरू शकतो आणि मतदाराला कोणत्याही केंद्रावरून मत देता येईल. 

नवी दिल्ली - सध्या मतदान करायचे असेल तर ज्या मतदार संघात आपलं नाव नोदं आहे तिथं जाऊन मतदार केंद्रात मतदान करावं लागतं. मात्र आता यामध्ये बदल होण्याची शक्यता असून देशातील नागरिकांना दूरस्थ पद्धतीनं मतदान करता येईल असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. यासाठी आवश्यक अशा चाचण्या घेतल्या जात असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिली. 

अकराव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये त्यांनी म्हटलं की, या संदर्भातील यंत्रणेची रंगीत तालीम सुरू झाली आहे. यात पहिल्या टप्प्यातील निष्कर्ष सकारात्मक आले आहेत. तसंच यासाठी आवश्यक असं तंत्रज्ञान आयआयटी मद्रासकडून विकसित केले जात आहे. त्याचा प्रत्यक्ष वापर सुरू झाल्यानंतर दूरस्थ मतदानाची सुविधा उपलब्ध होईल. यामुळे मतदारांना मतदान करण्यासाठी त्यांच्या मूळ गावी जाण्याची आवश्‍यकता भासणार नाही. यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचे माजी वरिष्ठ निवडणूक उपायुक्त संदीप सक्सेना यांनी सांगितले होते.

हे वाचा - ममतादीदी गरजल्या; 'स्वतःचं शीर धडावेगळं करून घेईन, पण भाजपपुढे झुकणार नाही'

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा म्हणाले की, निवडणूक आयोग सध्या या योजनेवर काम करत असून रिमोट वोटिंग प्रोजेक्ट असं नाव देण्यात आलं आहे. लवकरच देशभरात याची रंगीत तालीम घेतली जाईल. रिमोट वोटिंग प्रोजेक्टवर संशोधन सुरू जालं असून यामुळे मतदानासाठी मूळ गावी जावं लागणार नाही. जिथे असाल तिथून मत देता येणार आहे. यामुळे जे लोक नोकरी, कामानिमित्त बाहेर असतात त्यांना फायदा होणार आहे. 

हे वाचा - 'संपूर्ण देश तुम्हाला धन्यवाद देईल'; शेतकऱ्याचे PM मोदींच्या आईला भावुक पत्र

मतदानावेळी बाहेरगावी राहणाऱ्यांना त्यांच्या मूळ गावी यावं लागतं. अशावेळी रिमोट वोटिंग प्रोजेक्ट फायदाचा ठरू शकतो आणि मतदाराला कोणत्याही केंद्रावरून मत देता येईल. परदेशात राहणाऱ्या मतदारांसाठी पोस्टल मतदानाच्या पर्यायावर विचार सुरू असून कायदा मंत्रालय यावर विचार करत आहे अशीही माहिती त्यांनी दिली. 
भारत भारत भारत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: election commission says we are working on remote voting project