

SIR
esakal
New Delhi: मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेतून नाव वगळलेल्या मतदारांना निवडणूक आयोगाने आणखी एक संधी दिली आहे. अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार नोंदणी अशा कारणांमुळे ज्यांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट झाली नाहीत त्यांना आता पुन्हा अर्ज करता येणार आहे. महाराष्ट्रासह सात राज्यांमध्ये हा निर्णय लागू करण्यात आला आहे.