Election Commission: बिहारमधील गोंधळानंतर आता निवडणूक आयोगाने ‘SIR’बाबत घेतला मोठा निर्णय!

Bihar Voter List Update : मतदार यादी विशेष पडताळणी मोहीमेस विरोधकांनी जोरदार विरोध केला आहे.
Election Commission India
Election Commission IndiaSakal
Updated on

Election Commission’s Special Intensive Revision 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणूक आयोगाकडून करण्यात येत असलेल्या, SIR(Special Intensive Revision) मतदार यादीच्या विशेष पडताळणीमुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे.  तरी आता निवडणूक आयोगाने केवळ बिहारमध्येच नाहीतर  देशभरातच मतदार याद्यांचे पुनरावलोकन करण्याबाबत निर्णय घेतला आहे.

निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या पुनरावलोकनाबाबत २४ जूनच्या आदेशात म्हटले आहे की, मतदार याद्या सुरक्षित ठेवण्यासाठी संविधानाच्या नियमांचे पालन करून, आता देशभरात ‘एसआयआर’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी देशभरातही कार्यक्रम जारी केला जाईल. अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.

मतदार यादी पारदर्शक करण्यासाठी वेळोवेळी ती सुधारणे आवश्यक असल्याचे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे, जेणेकरून त्यातून अपात्र व्यक्तींना काढून टाकून निवडणुकीची सत्यता आणखी वाढवता येईल. काल SIR विरोधात झालेल्या निषेधाला उत्तर देताना निवडणूक आयोगाने त्याचे महत्त्व स्पष्ट केले होते.

Election Commission India
sex in space : अंतराळात शारीरिक संबंध ठेवता येतात का अन् जर असं काही भलतंच घडलंच तर काय होईल?

पुनरावलोकन मोहिमेदरम्यान घरोघरी जाऊन मतदारांची सत्यता तपासली  जाणार आहे. तसेच आवश्यक ती कागदपत्रे पुरावा म्हणून सादर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले. दुसरीकडे निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने कोट्यवधी मतदारांची नावे वगळण्याचा कट रचला असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com