esakal | By election 2020: पोटनिवडणुकांमध्ये भाजपचाच झेंडा; काँग्रेसचा धुव्वा
sakal

बोलून बातमी शोधा

by election result 2020 gujarat manipur odisha jharkhand karnataka

पोटनिवडणुका असलेल्या राज्यांमध्ये सकाळच्या टप्प्यातील कल पाहता, भाजपचीच आघाडी असल्याचे दिसत आहे. अपवादात्मक जागांवर काँग्रेस आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

By election 2020: पोटनिवडणुकांमध्ये भाजपचाच झेंडा; काँग्रेसचा धुव्वा

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : बिहारच्या विधानसभा निवडणुकीबरोबरच मध्य प्रदेश आणि देशातील इतर काही महत्त्वाच्या राज्यांमध्ये पोट निवडणूक होत आहे. त्यात मणिपूर, झारखंड, ओडिशा, गुजरात या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये सकाळच्या टप्प्यातील कल पाहता, भाजपचीच आघाडी असल्याचे दिसत आहे. अपवादात्मक जागांवर काँग्रेस आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

मणिपूरमध्ये काँग्रेसची प्रतिष्ठापणाला 
मणिपूरमध्ये काँग्रेसच्या चार आमदारांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याने, त्या चार जागा आणि आणखी एका जागेवर पोटनिवडणूक होत आहे. पाच पैकी एका जागेवर भाजपने विजयी आघाडी घेतल्याची माहिती आहे. तर काँग्रेस वांगोई मतदार संघात आघाडीवर आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन, आमदार भाजपमध्ये गेल्यामुळं काँग्रेससाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची आहे. काँग्रेस प्रतिष्ठा राखणार का? याची उत्सुकता आहे. 

आणखी वाचा - बिहारमध्ये काँटे की टक्कर; नितीशकुमार की तेजस्वी यादव?

झारखंडमध्ये चुरशीची लढत
झारखंडमध्ये दोन जागांवर पोटनिवडणूक होत आहे. दोन्ही जागांवर अत्यंत चुरस असून, एका जागेवर काँग्रेस तर एक जागेवर भाजप आघाडीवर आहे. दुमका विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार लोईस मरांडी तर, बेरमो मतदारसंघात भाजपचे योगेश्वर महातो आघाडीवर आहेत. 

ओडिशामध्ये बीजेडीच आघाडीवर
ओडिशामध्येही दोन जागांवर पोटनिवडणूक होत असली तरी तेथे, राज्यातील सत्ताधारी बिजू जनता दलालाच आघाडी मिळाली आहे. दोन्ही मतदारसंघांमध्ये बिजू जनता दलाचा विजय निश्चित असल्याचं मानलं जातंय. त्यामुळं ओडिशातील पोटनिवडणुकीची फारशी उत्सुकता राहिलेली नाही. 

आणखी वाचा - भाजप मध्य प्रदेशचा गड राखणार!

गुजरातमध्ये भाजपच
गुजरातमध्ये 8 जागांवर पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं होतं. त्यातील 8 जागांवर सध्या भाजपा तर 1 जागेवर काँग्रेस आघाडीवर असल्याचे कल सध्या दिसत आहे. राज्यातील ही पोट निवडणूक एकतर्फी असल्याचं मानलं जातंय. आठ जागांवर निवडणूक होत असतानाही प्रचाराची फारशी चर्चा झालेली नव्हती. या आठ पैकी सात जागा भाजप खिशात घालत असल्याचे चित्र सकाळच्या टप्प्यात दिसत आहे.

उत्तर प्रदेशात भाजपचाच करिष्मा
उत्तर प्रदेशातही सात जागांवर पोटनिवडणूक होत आहे. राज्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा करिष्मा कायम आहे. पोट निवडणुकीच्या सात पैकी पाच जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. एका जागेवर समाजवादी पक्षाचे तर, एका जागेव अपक्ष उमदेवार आघाडीवर आहेत. हाथरस बलात्कार प्रकरणानंतर राज्यात योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात लाट उसळळी होती. परंतु, पोटनिवडणुकीतील मतदानावर त्याचा कोणताही परिणाम दिसून आलेला नाही.