गोव्यात पर्रीकर, राणे यांचा विजय

अवित बगळे
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

आज (सोमवार) या दोन जागांसाठी मतमोजणी झाली. सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू झाली, 10 वाजेपर्यंत दोन्ही निकाल जाहीर करण्यात आले. पणजीच्या जुने गोमेकॉ इमारतीत ही मतमोजणी झाली. पहिल्या मजल्यावर वाळपई आणि तळमजल्यावर पणजी पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली.

पणजी (गोवा) : पणजी, वाळपई पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी विजय मिळविला. या विजयानंतर पर्रीकर यांनी पुढील आठवड्यात राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले.

आज (सोमवार) या दोन जागांसाठी मतमोजणी झाली. सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू झाली, 10 वाजेपर्यंत दोन्ही निकाल जाहीर करण्यात आले. पणजीच्या जुने गोमेकॉ इमारतीत ही मतमोजणी झाली. पहिल्या मजल्यावर वाळपई आणि तळमजल्यावर पणजी पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. पणजी व वाळपई पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी तीन फेर्‍यांमध्ये झाली आणि तिन्ही फेऱ्यांमध्ये भाजपचे हे दोन्ही उमेदवार आघाडीवर राहिले.

पणजीतून भाजपतर्फे मनोहर पर्रीकर आणि काँग्रेसतर्फे राष्ट्रीय सरचिटणीस गिरीश चोडणकर रिंगणात आहेत. याशिवाय गोवा सुरक्षा मंचचे आनंद शिरोडकर व अपक्ष उमेदवार केनेथ सिल्वेरा हेदेखील निवडणूक रिंगणात असल्याने सार्‍यांचे लक्ष मतमोजणीकडे लागले होते. अखेर पर्रीकर यांनी अपेक्षेप्रमाणे विजय मिळविला. पर्रीकर यांनी 4803 मतांनी विजयी मिळविल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

वाळपईतून भाजपतर्फे विश्‍वजीत राणे व काँग्रेसचे रॉय नाईक व अपक्ष उमेदवार रोहिदास गावकर निवडणूक रिंगणात होते. येथेही विश्वजित राणे यांनी 10 हजार 63 मतांनी विजय मिळविला. त्यामुळे गोव्यात भाजप आमदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.

Web Title: By-election Results: Manohar Parrikar, Vishwajeet Rane Wins in Goa