देशातील प्रत्येक गावात पोहचली वीज: नरेंद्र मोदी 

वृत्तसंस्था
रविवार, 29 एप्रिल 2018

प्रत्येक घरांघरात अजून वीज पोहचलेली नाही तो वेगळा भाग आहे त्यावर काम व्हायला हवे. गेल्यावर्षी प्रत्येक घरांत वीज पोहचावी या उद्देशाने सरकारने 'प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना' या योजनेला सुरुवात केली होती.

देशातील प्रत्येत गावागावत वीज पोहोचली आहे आणि ही गोष्ट प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ट्वीट करुन म्हटले आहे. त्यांनी मणिपूरच्या सेनापती जिल्ह्यातील लेसिंग या गावाचा उल्लेख करताना या बातमीने प्रत्येक भारतीयाला या गोष्टीचा अभिमान वाटेल असे आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

2015 च्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात त्यांनी बोलताना पुढच्या 1000 दिवसांच्या आत प्रत्येक गावांत वीज पोहोचलेली असेल असे म्हटले होते, त्याप्रमाणे सरकारने 'दिनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती' योजनेची घोषणा केली होती.

प्रत्येक घरांघरात अजून वीज पोहचलेली नाही तो वेगळा भाग आहे त्यावर काम व्हायला हवे. गेल्यावर्षी प्रत्येक घरांत वीज पोहचावी या उद्देशाने सरकारने 'प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना' या योजनेला सुरुवात केली होती.

Web Title: Electricity Reached Every Village In Country Says PM Modi