
हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना सरकारकडून ६ लाखांची नुकसान भरपाई देण्यात आली. पण या नुकसान भरपाईच्या रकमेवर तब्बल ६ महिलांनी दावा केलाय. मृत व्यक्ती आपला पती असल्याचं या ६ महिला सांगत असल्यानं आता नवा वाद निर्माण झाला आहे. छत्तीसगढच्या जशपूर जिल्ह्यात हा प्रकार समोर आलाय.