इलॉन मस्क यांनाही 'ताजमहल'ची भूरळ, २००७ च्या भेटीची आठवण काढत म्हणतात... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Elon Musk on Tajmahal

इलॉन मस्क यांनाही 'ताजमहल'ची भूरळ, २००७ च्या भेटीची आठवण काढत म्हणतात...

नवी दिल्ली : अब्जाधीश इलॉन मस्क (Elon Musk) यांनी भारतीय वास्तूंचे तोंडभरून कौतुक केले. त्यांनी गेल्या २००७ मध्ये आपल्या भारत भेटीच्या आठवणींना उजाळा देत ताजमहल (Tajmahal) खरोखरंच जगातील आश्चर्य असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा: ट्विटर वापरण्यासाठी लागणार पैसे, इलॉन मस्क यांची मोठी घोषणा

हिस्ट्री डिफाइंड नावाच्या ट्विटरून आग्र्याच्या लाल किल्ल्यावरील दर्शनी भागाचा फोटो शेअर करण्यात आला. त्याच ट्विटला उत्तर देत इलॉन मस्क यांनी ताजमहलचे कौतुक केले. हे सर्व अद्भूत आहे. मी २००७ मध्ये भेट दिली होती. त्यावेळी ताजमहल पाहिला होता. ताजमहल खरोखरच जगातील एक आश्चर्य आहे, असं इलॉन मस्क म्हणाले. पण, भारतीय ट्विटर युजर्सने हलकं-फुलकं ट्रोलिंग देखील केलं. आमच्या ताजमहलला विकत घेऊ नका, असं अनेकांनी म्हटलं आहे.

विशेष म्हणजे इलॉन मस्क यांची आई मये मस्क यांनी वैयक्तिक किस्सा शेअर करत त्यांच्या ट्विटला उत्तर दिले. “1954 मध्ये तुमचे आजी-आजोबा दक्षिण आफ्रिकेहून ऑस्ट्रेलियाला जाताना ताजमहल पाहायला गेले होते. त्यांनी रेडिओ किंवा जीपीएसशिवाय प्रवास केला होता'', असं त्यांनी म्हटलंय.

ट्विटर विकत घेतल्यापासून ट्विट्सने घातला धुमाकूळ -

इलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्त असून त्यांची संपत्ती $273.6 अब्ज आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटर विकत घेणार अशी घोषणा केली होती. त्यानंतर काही दिवसांनी कंपनीने घोषणा केली की, आता इलॉन मस्क ट्विटरचे मालक असतील. इलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर त्यांच्या ट्विटने धुमाकूळ घातला आहे. त्यांनी ट्विटरमध्ये अनेक बदल करणार असल्याचे म्हटले. त्यानंतर त्यांनी कोका-कोला देखील विकत घेण्याची घोषणा केली. मला आता कोका कोला विकत घ्यायचे आहे जेणेकरून त्यात कोकेन मिसळता येईल, असं त्यांनी म्हटलं होतं.

Web Title: Elon Musk Recalls Tajmahal Visit Says It Is Amazing

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Elon Musk
go to top