Shocking Incident Employee Dies Soon After Informing About Illness

Shocking Incident Employee Dies Soon After Informing About Illness

Esakal

कसलं व्यसन नाही, तंदुरुस्त अन् आनंदी आयुष्य; तब्येत बरी नाही मेसेज केल्यानंतर १० मिनिटात सहकाऱ्याचं निधन, बॉसला धक्का

तब्येत बरी नसल्यानं सुट्टी घेतोय असा मेसेज पाठवल्यानंतर पुढच्या १० मिनिटातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संबंधित सहकाऱ्याच्या कुटुंबियांसह ऑफिसमधील सहकाऱ्यांनाही धक्का बसला.
Published on

आपलं आयुष्य किती क्षणभंगुर आहे याची प्रचिती आल्याचं एका बॉसने शेअर केलंय. सहकाऱ्यानं तब्येत बरी नसल्यानं सुट्टी घेतोय असा मेसेज पाठवल्यानंतर पुढच्या १० मिनिटातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संबंधित सहकाऱ्याच्या कुटुंबियांसह ऑफिसमधील सहकाऱ्यांनाही धक्का बसला. कोणतंही व्यसन नसलेल्या, आजार नसलेल्या व्यक्तीला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि तो कायमचा आपल्यातून निघून गेला. समोर निरोगी दिसणाऱ्या व्यक्तीला अचानक अशा संकटांना सामोरं जावं लागू शकतं हेच यातून दिसत असल्याची भावना बॉसने व्यक्त केलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com