Chattisgarh News : : सुरक्षा दल-नक्षलवाद्यांत छत्तीसगडमध्ये धुमश्‍चक्री

चकमकीत जखमी झालेले नक्षलवादी जंगलात पळून गेले
encounter between naxal forces in chattisgarh
encounter between naxal forces in chattisgarhsakal

सुकमा : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक झाली. यात चार ते सहा नक्षलवादी जखमी किंवा मारले गेले असावेत, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. घटनास्थळी कोणाचेही मृतदेह सापडले नाही. चकमकीत जखमी झालेले नक्षलवादी जंगलात पळून गेले आणि ते मृतदेह सोबत घेऊन गेले असावेत, असे सांगण्यात येत आहे.

सुकमाच्या चिंतागुफा पोलिस ठाण्याच्या हद्दीत केदवाल गावाजवळील जंगलात आज सकाळी नक्षलवादी आणि सुरक्षा दलात जोरदार चकमक झाली. या कारवाईत जिल्हा राखीव दल (डीआरजी), कमांडो बटालियन फॉर रिसोल्यूट ॲक्शन (कोब्रा) आणि सीआरपीएफचे जवान सहभागी झाले होते.

छोटेकेडवाल, बडेकेडवाल आणि सिंगमाडगु गावांत ३० ते ३५ नक्षलवादी गोळा झाल्याची खबर लागली होती. या नुसार सुरक्षा दलाचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. नक्षलवाद्यांना घेरण्याचा प्रयत्न झाला असता गोळीबार सुरू झाला. सुमारे तासभर चाललेल्या गोळीबारात चार ते सहा नक्षलवादी जखमी झाले असावेत किंवा मारले गेले असावेत, असा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यानंतर परिसरात झडतीसत्र सुरू केले. मात्र मृतदेह आढळून आले नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com