जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत दहशतवादी ठार

वृत्तसंस्था
बुधवार, 22 मे 2019

कुलगाममधील गोपालपोरामध्ये मंगळवारी (ता. 21) रात्री उशिरापासून सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरु आहे.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. परिसरामध्ये काही दहशतवादी लपल्याची माहिती असून, जवानांनी शोध मोहिम सुरू ठेवली आहे, अशी माहिती अधिकाऱयांनी आज (बुधवार) दिली.

अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगाममधील गोपालपोरामध्ये मंगळवारी (ता. 21) रात्री उशिरापासून सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरु आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला सुरक्षा रक्षकांनी चोख प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला. परिसरात लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पुलवामात केंद्रीय राखीव पोलिस दल, राष्ट्रीय रायफल्स आणि स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप यांनी संयुक्त कारवाई करत एक दहशवादी ठार झाला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Encounter on in Kashmirs Kulgam one terrorist killed