शंभर एन्काउंटर करणाऱ्या IPS अधिकाऱ्याला हृदयविकाराचा झटका; रुग्णालयात दाखल

ajay pal sharma
ajay pal sharma

नवी दिल्ली - एन्काउंटर स्पेशालिस्ट आयपीएस अधिकारी अजय पाल शर्मा यांना हृदयविकाराचा झटका आल्याने लखनऊच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (encounter specialist ips ajay pal sharma heart attack )

ajay pal sharma
भाजपकडून आमदारांना खोक्यांची ऑफर? CM केसीआर यांनी शेअर केले व्हिडीओ

आयपीएस अजय पाल शर्मा यांना काल संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आला हaता. त्यानंतर त्यांना तातडीने लखनऊच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अजय पाल शर्मा हे सध्या डायल ११२ चे एसपी आहेत.

हेही वाचा भारतीय मंदिरे- धार्मिकतेबरोबरच सामाजिक अंगे जपणारी केंद्रे

मेदांता हॉस्पिटलचे मीडिया प्रभारी डॉ आलोक कपूर यांनी सांगितले की, आयपीएस अजय पाल शर्मा यांना हृदयविकाराचा किरकोळ झटका आला आहे, त्यामुळे त्यांना मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे. किरकोळ हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.

ajay pal sharma
जातीवादाचा आणखी एक बळी! पोलिसांवर आरोप करत दलित तरुणाने संपवलं जीवन

अजय पाल शर्मा यांची प्रकृती ठीक असून त्यांना उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. अजय पाल हे २०११ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून मूळचे पंजाबचे आहेत. त्यांची पहिली पोस्टिंग सहारनपूरमध्ये झाली होती.

अजय पाल यांनी 100 हून अधिक एन्काउंटर केले आहेत. योगी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांना नोएडामध्ये पोस्टिंग देण्यात आली होती. अजय पाल शर्मा यांनी जून 2019 मध्ये रामपूरमध्ये एका 6 वर्षीय मुलीवर बलात्कार करून खून केल्याचा आरोप असलेल्या नाझीलला पाठलाग करून अटक केली होती. त्यामुळे अजय पाल यांचे कौतुक झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com