श्रीनगरमध्ये चकमकीत एक जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
रविवार, 12 ऑगस्ट 2018

या चकमकीनंतर परिसरात बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून, शोधमोहिम राबविण्यात येत आहे. पहाटे चार वाजता पोलिसांकडून शोधमोहिम सुरु असताना एका घरातून पोलिसांवर गोळीबार करण्यात आला.  

श्रीनगर : श्रीनगर शहरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान हुतात्मा झाला असून, अन्या तीन जवान जखमी झाले आहेत. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरमधील बाटमालु भागात आज (रविवार) पहाटे चारच्या सुमारास सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत जम्मू-काश्मीर पोलिस दलातील एक जवान हुतात्मा झाला. तर, अन्य तिघेजण गंभीर जखमी आहेत. यामध्ये दोन सीआरपीएफच्या जवानांचाही समावेश आहे. त्यांना 92 बेस कॅम्प रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चकमकीचे ठिकाण लाल चौकापासून अवघ्या एक किमी अंतरावर आहे. दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे.

या चकमकीनंतर परिसरात बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून, शोधमोहिम राबविण्यात येत आहे. पहाटे चार वाजता पोलिसांकडून शोधमोहिम सुरु असताना एका घरातून पोलिसांवर गोळीबार करण्यात आला.  

Web Title: encounter in Srinagar one cop dead three injured