
धमक्यांशी संबंधित Xiaomi चे दावे खोटे, ED चे स्पष्टीकरण
नवी दिल्ली : चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi च्या अधिकाऱ्यांना धमकावल्याचा आरोप अंमलबजावणी संचालनालयाने फेटाळून लावला आहे. ED च्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कर्मचारी आणि कुटुंबीयांना धमकी दिली होती असा आरोप Xiaomi ने केला होता. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांकडून संबंधित कंपनीचे सर्व आरोप फेटाळून लावले असून, हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. (Enforcement Directorate Refused Xiaomi Allegations)
हेही वाचा: Loudspeaker Row : मुंबईत दोन मशिदींवर गुन्हा दाखल
पीटीआय या वृत्तसंस्थेने तपास संस्थेच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, Xiaomi इंडियाच्या अधिकाऱ्यांचे आरोप खोटे आणि निराधार आहेत. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी FEMA अंतर्गत प्रत्येक प्रसंगी ईडीसमोर स्वेच्छेने त्यांचे जबाब नोंदवले आहेत. तसेच ईडी ही एक नैतिक तत्त्वांवर कार्य करणारी संस्था आहे.
ईडीवरील आरोप काय
Xiaomi ने दावा केला होता की, त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान शारीरिक हिंसा आणि धमक्यांचा सामना करावा लागल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणी कंपनीने 4 मे रोजी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात ईडी अधिकाऱ्यांनी शाओमी इंडियाचे माजी प्रमुख मनु कुमार जैन आणि सध्याचे मुख्य वित्तीय अधिकारी समीर बीएस राव आणि त्यांच्या कुटुंबीयांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिल्याचे म्हटले होते. मनोज जैन आणि बीएस राव यांचे 25 मार्च ते 26 एप्रिल दरम्यान जबाब नोंदवण्यात आले आहेत.
हेही वाचा: जयपूर हिंसाचारावर कंगनाची 'बुल्डोझर' कमेंट; म्हणाली...
म्हणून ईडीची Xiaomi वर कारवाई
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) स्मार्टफोन निर्माता Xiaomi वर कर चोरी प्रकरणी काही दिवसांपूर्वी मोठी कारवाई केली. यात ED ने Xiaomi India Pvt Ltd चे बँक खात्यांमध्ये जमा केलेले 5551.27 कोटी रुपये जप्त केले. यानंतर जारी केलेल्या निवेदनात कंपनीने केलेल्या कर चोरी प्रकरणात ईडीने विदेशी मुद्रा व्यवस्थापन कायदा, 1999 (FEMA) अंतर्गत ही कारवाई केल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.
Web Title: Enforcement Directorate Slams Chinese Smartphone Maker Xiaomi Over Allegations
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..