जयपूर हिंसाचारावर कंगनाची 'बुल्डोझर' कमेंट; म्हणाली...

राजस्थानमधील जयपूर इथे धाकड सिनेमाच्या प्रमोशनसाठी गेलेली असताना कंगना रनौतनं सिनेमापेक्षा अधिक राजकारणावर बोलणं पसंत केलं.
Kangana Ranaut
Kangana RanautGoogle

बुल्डोजर,बीजेपी,क्राइम हे शब्द सध्याच्या दिवसांत देशात अनेक ठिकाणी ऐकायला मिळत आहेत. बॉलीवूड स्टार्सही याला अपवाद नाहीत,आता ते देखील राजस्थानमध्ये बुल्डोजर आणला पाहिजे असं बोलायला लागलेत. असाच इशारा बॉलीवूड क्वीन कंगना रनौतनं आपल्या 'धाकड' सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं गेली असताना जयपुरच्या राजमंदीरात दिला आहे. राजकारणातील प्रवेशाविषयी विचारलेल्या प्रश्नावर कंगना(Kangana Ranut) म्हणाली,''मला माहित नाही,सध्या तरी माझा असा काही विचार नाही. मी खूप चांगल्या प्रोजेक्ट्सवर काम करीत आहे. मला आता चांगल्या भूमिका मिळत आहेत. माझा टाइम सध्या खुप चांगला सुरु आहे. तसं राजकीय व्यक्तिरेखा मी सिनेमातनं साकारली आहे त्यामुळे ते एक चांगलं करिअर आहे असं मला नक्कीच कळालं आहे. राजकारणातील डावपेच आणि अनेक छोट्या गोष्टी मी शिकले आहे. पण ते एक वेगळं स्ट्रगल आहे. एक वेगळं करिअर आहे. सुरुवातीला मला सिनेमातून खूप वेगवेगळ्या गोष्टी करुन दाखवायच्या आहेत''. 'धाकड'च्या जयपूर येथील प्रमोशनला कंगनासोबत अर्जुन रामपाल देखील उपस्थित होता.

Kangana Ranaut
क्रिकेटर के.एल.राहूलसोबत लग्नाच्या बातम्यांवर आथियानं सोडलं मौन; म्हणाली...

कंगनाने राजकारणावर आपले विचार विस्तारीतपणे मांडले. देशातनं क्राइम संपवण्यावर ती बोलली,राजस्थानमध्ये असं सरकार आणि जे गुन्हेगारी विश्वाचा सर्वनाश करेल. देशात बुल्डोजर चालवले जातात यावर मत मांडताना ती म्हणाली,बुल्डोडर घेऊन आलात तर सगळं ठीक होईल. ती स्पष्ट यावर फारकाही बोलली नाही. ती यावर खूप गोल-गोल फिरुन उत्तर देत होती. पण आपल्या बोलण्यातून तिनं भाजप,मोदी आणि योगी यांच्याकडे आपल्या बोलण्यातून अनेकदा इशारा केला.

कंगना रनौत ट्वीटरवर ट्वीटच्या माध्यमातून केलेल्या पोस्ट आणि त्यामुळे झालेल्या वादांवर म्हणाली,''मी जे बोलते ते निगेटिव्ह विचार करणाऱ्यांना निगेटिव्ह वाटतं आणि पॉझिटिव्ह विचार करणाऱ्यांना पॉझिटिव्ह वाटतं. मी गेल्या दोन वर्षांपासून सिनेमाची तयारी करत असतानाच निगेटिव्ह गोष्टींसाठी निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह गोष्टींसाठी पॉझिटिव्ह लिहित होती''. ट्वीटरनं तिला बॅन केलय याविषयी विचारलं असताना ती म्हणाली,''त्यांच्या दृष्टीने मी समाजासाठी घातक आहे. हो,आता एलन मस्क मला पुन्हा एक संधी देतील तर मी पुन्हा ट्वीटरवर आपलं मत मांडेन,पण सध्या तरी मी समाजासाठी संकट आहे''.

Kangana Ranaut
'केजीएफ चॅप्टर 2' मधील 'या' अभिनेत्याचं निधन

अर्जुन रामपालने देखील यावेळी गुन्हेगारी विश्वावर आपलं मत मांडलं. राजस्थान आणि सोबतच देशात इतरत्र महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर अर्जुन म्हणाला,''ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. खरं तर आम्ही पुरुषांनी एकत्र येऊन या अत्याचारांविरोधात आवाज उठवायला हवा. प्रत्येक महिलेला आपल्या देशात सुरक्षित वाटेल असं काम आपण करायला हवं. आपण महिलांचं रक्षण करायला हवं'', असं अर्जुन म्हणाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com