एकतर्फी प्रेमातून गायिकेवर सहा वर्षे पाळत; इंजिनिअरला अखेर अटक

One arrested in Bulli Bai Case
One arrested in Bulli Bai Caseesakal

मुंबई: आयटी इंजिनिअर असलेल्या एका तरुणाने एकतर्फी प्रेमामधून (One sided love) एका गायिकेचा पिच्छा पुरवला आहे. तिचा सततचा पाठलाग करुन तिच्या मागे लग्नाचा तगादा लावल्याने हैराण झालेल्या या गायिकेने अखेर पोलिसांकडे धाव त्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर आता या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला अटकही करण्यात आली आहे. या आरोपीने मुंबईतील या गायिकेवर सतत पाळत ठेवणं, तिची सोशल मीडियावर बदनामी करणं तसेच तिला अश्लील फोटो पाठवणं अशाप्रकारचे वेगवेगळे प्रकार करत तिला हैराण करुन सोडलं होतं. एक-दोन नव्हे तर मागील तब्ब सहा वर्षांपासून हा आरोपी पीडित गायिकेला आणि तिच्या मॅनेजरला या प्रकारांमधून छळत होता. (Mumbai News)

One arrested in Bulli Bai Case
कर्मचाऱ्यांनी नजरचुकीने लावलं कुलूप; 18 तास बँकेतच अडकले आजोबा

आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर गायिकेच्या मॅनेजरनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी आयटी इंजिनिअरवर कारवाई करत त्याला अटक करण्यात आली आहे. विजयकांत मांडा असं या अटक केलेल्या 34 वर्षीय आरोपीचं नाव आहे. हा आरोपी मूळचा तामिळनाडू राज्यामधील विशाखापट्टणम येथील रहिवासी आहे. तो सध्या आयटी इंजिनिअर (IT engineer) म्हणून कार्यरत आहे. मात्र, गेल्या सहा वर्षांपासून तो मुंबईतील या 27 वर्षीय गायिकेला आणि तिच्या मॅनेजरला छळत आहे.

One arrested in Bulli Bai Case
देशात पहिल्यांदाच धावली ग्रीन हायड्रोजनवरील कार, गडकरींनी केला प्रवास

गायिकेला असा दिला त्रास

या आरोपीने गायिकेच्या वेगवेगळ्या मैफिल आणि सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना हजेरी लावणं, सतत लक्ष वेधणं आणि पाळत ठेवण्यातून तिला त्रास दिला आहे. एवढंच नव्हे तर तिचा पाठलाग करत या गायिकेच्या घराच्या इमारतीच्या गेटवर येऊन थांबण्याचा धक्कादायक प्रकार देखील केला आहे. या सगळ्या प्रकारांचा त्रास असह्य होऊन अखेर या गायिकेने मॅनेजरकरवी 17 मार्च रोजी गुन्हा दाखल केला आहे. या गायिकेनंच आयोजित केलेल्या एका स्पर्धेत सहभागी होत या आरोपीने तिचा नंबर मिळवला आणि तिला सातत्याने फोन करुन, मॅसेज करुन त्रासही दिला आहे. 2019 मध्ये आरोपी विजयकांतने मुंबई, चेन्नई, बंगळुरु, हैदराबाद अशा विविध शहरात आयोजित केलेल्या गायिकेच्या कॉन्सर्टना हजेरी लावली होती. तसेच तो चार वेगवेगळ्या नंबरवरुन मेसेज करुन गायिकेला त्रास द्यायचा असाही आरोप आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com