मुंबई : भारतीय रेल्वेतर्फे उत्तराखंडमध्ये १२५ किमीचा रेल्वे प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. देशातील प्रसिद्ध कंपनी 'एल अॅण्ड टी'कडे या प्रकल्पाचे कंत्राट आहे. या प्रकल्पांतर्गत कंपनीच्या अभियंत्यांनी शिवपुरी ते ब्यासीदरम्यानचा एक किलोमीटरचा बोगदा अवघ्या २६ दिवसांत खणला आहे.
उपलब्ध माहितीनुसार देवप्रयाग, टिहरी गढ़वाल आणि कर्णप्रयाग या जिल्ह्यांना या रेल्वे मार्गिकेने जोडण्यात येणार आहे. याअंतर्गत १०० किमीची रेल्वे मार्गिका बोगद्यात उभारली जात आहे. पैकी ३५ किमी मार्गिकेवरील बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. १२५ किमी असलेल्या या प्रकल्पाची किंमत १६ हजार कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर रेल्वे मार्गे उत्तराखंडला पोहोचणे सोपे होण्याची आशा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.