esakal | Engineers Day : 15 सप्टेंबरला का साजरा होतो 'इंजिनियर्स डे', वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

engineers day

दक्षिण बंगळूरमधील जयानगरच्या भागाचे नगरनियोजन विश्वेश्वरय्या यांनीच केलेले आहे. एशियातील बेस्ट प्लान्ड लेआउट अशी याची ओळख आहे. आज त्यांची यानिमित्त आठवण झाली आहे.

Engineers Day : 15 सप्टेंबरला का साजरा होतो 'इंजिनियर्स डे', वाचा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशभरात आज इंजिनियर्स डे साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य मंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पण, 15 सप्टेंबरलाच का इंजिनियर्स डे साजरा होतो, यामागील कहाणी रंजक आहे.

भारताचे महान इंजिनियर आणि भारतरत्न सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी 15 सप्टेंबरला इंजिनियर्स डे साजरा करण्यात येतो. इंजिनियरींग क्षेत्रात जबरदस्त कामगिरीमुळे त्यांना 1955 मध्ये भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. देशभरातील अनेक धरणे, पूल आणि पाण्याच्या योजना यशस्वी करण्यात विश्वेश्वरय्या यांचा मोलाचा वाटा आहे.

दक्षिण बंगळूरमधील जयानगरच्या भागाचे नगरनियोजन विश्वेश्वरय्या यांनीच केलेले आहे. एशियातील बेस्ट प्लान्ड लेआउट अशी याची ओळख आहे. आज त्यांची यानिमित्त आठवण झाली आहे. भारतात दरवर्षी सुमारे 20 लाख इंजिनियर्स तयार होतात. यामध्ये कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल आणि मॅकेनिकल इंजिनियर्सचा समावेश आहे.

loading image
go to top