रोख रकमेचा पुरेसा साठा उपलब्ध- आरबीआय

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

चेन्नई- पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बदलून नवीन नोट मिळवण्यासाठी नागरिकांची एकच धावपळ उडाली असली तरी रोख रोकमेचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आज (शुक्रवार) सांगितले.

'आरबीआय'ने प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'देशभरात 2,000 व इतर रकमेच्या नोटा उपलब्ध करून दिल्या असून, बॅंकामध्ये सर्व प्रकारच्या नोटांचा पुरेसा साठा आहे. बॅंकांमध्ये 10 नोव्हेंबर 2016 पासून नोटा बदलून मिळत आहेत. शिवाय, एटीएमध्येही पैसे उपलब्ध आहेत.'

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (ता. 8) मध्यरात्री 12 पासून 500 व 1000च्या नोटा चलनातून रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. परंतु, पुढील 50 दिवसांमध्ये त्या बदलून मिळणार आहेत.

Web Title: Enough cash is available, RBI says