देशात पुरेसे साखर उत्पादन

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 जानेवारी 2017

"इस्मा'चे स्पष्टीकरण; आयातीची गरज भासणार नाही

नवी दिल्ली- काही मूठभर सट्टेबाज आणि साखर शुद्धीकरण कारखाने (रिफायनरीज) हे साखरेचे उत्पादन कमी होणार असल्याच्या अफवा पसरवीत आहेत, असे निवेदन भारतीय साखर कारखाना संघटनेने (इस्मा) आज जारी केले असून, 2016-17 च्या साखर हंगामाअखेर साखेरेचे पुरेसे उत्पादन देशात होणार आहे आणि साखरेच्या आयातीची गरजही भासणार नाही, असे म्हटले आहे. संघटनेच्या अंदाजानुसार सध्या 77.5 लाख टनांचा राखीव साठा असून, हंगामअखेर 213 लाख टन साखर उत्पादन अपेक्षित आहे. म्हणजेच हंगामाअखेर सुमारे 290 लाख टन साखर देशात उपलब्ध असेल, असेही संघटनेने म्हटले आहे.

साखरेचे उत्पादन कमी होणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने प्रसिद्ध होत आहेत. या संदर्भात उत्पादन आणि खपाशी (2016-17) संबंधित काही आकडेवारीही देण्यात आली होती, याकडे लक्ष वेधून संघटनेने म्हटले आहे, की देशांतर्गत बाजारात भीती निर्माण करणे, त्याद्वारे आंतरराष्ट्रीय बाजारातल्या किमती वाढण्यास मदत होऊ शकते; कारण या व्यापाऱ्यांनी आगाऊ कराराने जी साखर नोंदविलेली आहे तिचा दरही वाढावा आणि देशात साखरेची टंचाई दाखवून साखर आयातीला भाग पाडणे, असा हेतू यामागे आहे.

देशातील ऊस लागवडीखालील क्षेत्राची उपग्रहामार्फत पाहणी करण्यात आलेली आहे आणि त्याद्वारे उसाचे उत्पादन, साखरेचे उत्पादन याचा अंदाजही शास्त्रीय पद्धतीने घेण्यात आलेला आहे. त्यानुसार 2016-17 च्या साखर हंगामाअखेर साखरेचे 213 लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. तसेच सध्या साखरेचा 77.5 लाख टनांचा राखीव किंवा शिलकी साठाही अस्तित्वात आहे. याचबरोबर शीतपेये आणि मिठाई व अन्य साखरेच्या वस्तूंची निर्मिती करणाऱ्या बाजाराकडून मिळालेल्या माहितीनुसार साखरेची मागणी पूर्वीपेक्षा खालावलेली आढळते आणि त्याआधारे काढलेल्या अंदाजानुसार देशाची संभाव्य मागणी 242 लाख टन अपेक्षित आहे. म्हणजेच देशात उपलब्ध सुमारे 290 लाख टन साखरेचा साठा देशाची गरज भागविण्यास पुरेसा असेल, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पुढील वर्षी ऊस तसेच साखर उत्पादन हे वाढीव राहण्याचा अंदाजही संघटनेने व्यक्त केला असून, ऊस उत्पादकांना किफायतशीर भाव देण्याच्या दृष्टीने सरकारने साखरेची आयात करू नये, अशी सूचनाही करण्यात आलेली आहे. साखर आयातीचा निर्णय करताना परिस्थितीचा अचूक आढावा घेऊनच केला जावा, असेही संघटनेने म्हटले आहे.

"इस्मा'च्या अंदाजानुसार...
77.5 लाख टन
साखरेचा राखीव साठा

213 लाख टन
हंगामअखेर अपेक्षित उत्पादन

290 लाख टन
हंगामअखेर उपलब्ध साखर

Web Title: Enough sugar production in the country