Crime News: बलात्काराची तक्रार केल्यानं घरात घुसून महिला, वृद्धांना बेदम मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajasthan

Crime News: बलात्काराची तक्रार केल्यानं घरात घुसून महिला, वृद्धांना बेदम मारहाण

Rajasthan: राजस्थानमधून धक्कादायक घटना समोर येत आहे. लालपूर गावात एक महिला लाकूड आणण्यासाठी बाहेर गेली असता शेजाऱ्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर महिलेच्या कुटुंबीयांनी बलात्काराची पोलिसात तक्रार दाखल केली.

त्यामुळं आरोपीने काही लोकांना सोबत घेवून पिडीत महिलेच्या कुटुंबीयांवर हल्ला केला. त्या लोकांनी लाठ्या-काठ्या घेऊन महिलेच्या घरात घुसून महिला व वृद्धांवर जोरदार हल्ला केला. हल्ल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही घटना राजस्थानमधील कामा पोलीस स्टेशन हद्दीतील लालपूर गावातील आहे.

स्वयंपाकासाठी लाकूड आणण्यासाठी गेलेल्या महिलेसोबतच गावातील शाहरुख नावाच्या तरुणाने बंदुकीचा धाक दाखवत बलात्कार केला. याप्रकरणी पिडितेने कामण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा: भारतीय मंदिरे- धार्मिकतेबरोबरच सामाजिक अंगे जपणारी केंद्रे

हेही वाचा: राष्ट्रवादीला नेत्यांच्या पळवापळवीची भीती? अजित पवार सावध; कार्यकर्त्यांना म्हणाले...

पीडित महिलेने सांगितले की, "मी जवळच्या शेतात लाकूड आणण्यासाठी गेले होते. तिथे शाहरुखने माझ्या कपाळावर बंदूक ठेवली. आरडाओरडा केलास तर जीवे मारेन, अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने माझ्यावर बलात्कार केला.

माझा आरडाओरड ऐकून तिथे माझा दिर आला. त्यानंतर आरोपी तिथून पळून गेला. त्यानंतर पोलिसात तक्राग दिल्यानंतर, आरोपीच्या बाजूचे सर्व लोक काठ्या घेऊन आमच्या घरात घुसले. महिला व पुरुषांवर लाठ्या-काठ्यांनी अमानुष हल्ला केला."

टॅग्स :Rajasthanpolicecrime