

Provident Fund Latest Update EPFO New Rules
esakal
EPF Pension Scheme : EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात EPFO अंतर्गत अनिवार्य वेतन मर्यादा १५ हजार रुपयांवरून २५ हजार रुपये प्रतिमहिना करण्याचा प्रस्ताव आहे. या बदलामुळे खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पीएफ योगदानात वाढ होण्यासोबतच कर्मचारी ठेव संलग्न विमा योजना अर्थात EDLI अंतर्गत मिळणाऱ्या विमा संरक्षणावरही परिणाम होऊ शकतो.