

EPS-95 Pensioners Protest
esakal
डी.के.वळसे पाटील
मंचर: ईपीएस-९५ (EPS-95) योजनेअंतर्गत अत्यल्प पेन्शन मिळणाऱ्या निवृत्त कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी येत्या बुधवार (ता.५ ऑगस्ट) रोजी नवी दिल्ली जंतर मंतर येथे देशव्यापी महाआंदोलन करण्यात येणार असून, या आंदोलनात मोठ्या संख्येने पेन्शनधारकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांनी केले आहे.