'गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत न्यूटनचा नव्हे ब्रह्मगुप्तचा'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

राजस्थान विद्यापीठात सोमवारी (ता. 8) झालेल्या एका कार्यक्रमात देवनानी यांनी हा दावा केला. ब्रह्मगुप्त दुसरा याने हजारो वर्षांपूर्वी गुरुत्वाकर्षणाच्या नियम शोधला असल्याचे ते म्हणाले. ""गुरुत्वाकर्षणाचा नियम ही न्यूटनची देण आहे, असा समज आपल्या सर्वांचा आहे; पण इतिहासाचा मागोवा घेताना न्यूटनच्या आधी एक हजार वर्षे ब्रह्मगुप्त दुसरा याने गुरुत्वाकर्षणाचे नियम मांडले. या सत्याचा समावेश आपण अभ्यासक्रमात का करीत नाहीत, असा प्रश्‍न देवनानी यांनी केला. 

जयपूर, ता. 9 (पीटीआय) : आयझॅक न्यूटनच्या आधी गुरुत्वाकर्षणाच्या नियमांचा शोध ब्रह्मगुप्त दुसरा याने लावला असल्याचा वादग्रस्त दावा राजस्थानचे शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी यांनी केला. 

राजस्थान विद्यापीठात सोमवारी (ता. 8) झालेल्या एका कार्यक्रमात देवनानी यांनी हा दावा केला. ब्रह्मगुप्त दुसरा याने हजारो वर्षांपूर्वी गुरुत्वाकर्षणाच्या नियम शोधला असल्याचे ते म्हणाले. ""गुरुत्वाकर्षणाचा नियम ही न्यूटनची देण आहे, असा समज आपल्या सर्वांचा आहे; पण इतिहासाचा मागोवा घेताना न्यूटनच्या आधी एक हजार वर्षे ब्रह्मगुप्त दुसरा याने गुरुत्वाकर्षणाचे नियम मांडले. या सत्याचा समावेश आपण अभ्यासक्रमात का करीत नाहीत, असा प्रश्‍न देवनानी यांनी केला. 

"शालेय अभ्यासक्रमात बदल झाला आहे. राजपूत राजा महाराणा प्रताप यांच्यासह 200 भारतीय सेनानींचा यात नव्याने समावेश केला आहे. शिक्षण हे मूल्यांवर आधारित हवे,'' अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी नेता कन्हैया कुमारचा संदर्भ देत ते म्हणाले, की राजस्थानमध्ये कन्हैया जन्माला येऊ नये. 

वादग्रस्त वक्तव्ये 
ब्रह्मगुप्त दुसरा याला गुरुत्वाकर्षणाच्या नियमांचा प्रणेता ठरवून वाद ओढवून घेतलेल्या शिक्षणमंत्री देवनानी यांनी गेल्या वर्षीही वादग्रस्त विधान करून खळबळ उडवून दिली होती. संशोधनासंबंधी संकेतस्थळाचा हवाला देत जनावरांमध्ये केवळ गायच ऑक्‍सिजनचे उर्त्सजन करते, असे वक्तव्य त्यांनी केले होते. 

Web Title: esakal marathi news jaipur education minister controversial statement