नरेंद्र मोदींनी हसत हसत केले 'व्हिक्टरी' साईन

narendra_modi
narendra_modi

नवी दिल्ली- गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत दोन्ही राज्यातील कल भाजपच्या बाजुने येताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या निकालाचे स्वागत करत संसदेत प्रवेश करत असताना व्हिक्टरी साईन दाखवले.  

गुजरातच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य लागले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या घरच्या मैदानावर काँग्रेसने त्यांच्यासमोर आव्हान उभे केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये प्रचारासाठी 50 पेक्षा जास्त सभा घेतल्या होत्या. 

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (सोमवार) सुरूवात झाली आहे. सकाळी साडे आठ वाजता समजलेला कल भाजपच्या बाजूने होता. नंतरच्या अर्ध्या तासात कल बदलू लागला. गुजरातमध्ये गेल्या दोन दशकांमध्ये पहिल्यांदाच पहिल्या तासातील कल भाजपच्या विरोधात दिसला. त्यानंतरच्या अर्ध्या तासात पुन्हा भाजपच्या बाजूने कल गेला. सध्या भाजप 101 जागांवर तर काँग्रेस 79 जागांवर आघाडीवर आहे तर हिमाचल प्रदेशात भाजप 45 तर काँग्रेस 20 जागांवर आघाडीवर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com