जीएसटीमुळे करप्रणाली सुलभ होणार- नाईक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 जुलै 2017

वस्तू आणि सेवा कर प्रणाली (जीएसटी) ही सर्वसामान्यांसाठी लाभदायक ठरणार आहे. या पद्धतीमुळे करप्रणालीत सुसूत्रता निर्माण होईल, असे मत केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज पणजी येथे केले.

पणजी: वस्तू आणि सेवा कर प्रणाली (जीएसटी) ही सर्वसामान्यांसाठी लाभदायक ठरणार आहे. या पद्धतीमुळे करप्रणालीत सुसूत्रता निर्माण होईल, असे मत केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज पणजी येथे केले. ते पत्र सूचना कार्यालयाने आयोजित माध्यम कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जीएसटीचे आयुक्त के. अनपाझकन, पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक डी वी विनोदकुमार आणि सहायक संचालक बालाजी प्रभूगावकर होते.

नाईक म्हणाले, वस्तू आणि सेवा कर प्रणालीसाठी सर्व राजकीय पक्षांनी दिलेली मान्यता हे देशाच्या परिपक्व लोकशाहीचे प्रतिक आहेे. कर प्रणाली हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, त्यामुळे ती अतिशय सुलभ आणि सरळ असली पाहिजे. त्यामुळेच जीएसटीची यशस्वी अंमलबजावणी होईल.

अनपाझकन म्हणाले, देशात आतापर्यंत बहुप्रतिक्षीत अशी अप्रत्यक्ष करप्रणाली लागू झाली आहे, यामुळे नवा इतिहास रचला जाईल. एक राष्ट्र एक कर ही जीएसटीची संकल्पना आहे, त्यामुळे देशात आर्थिक सुसूत्रता निर्माण होईल. तसेच जीएसटीमुळे देशाच्या विकासदरात एक ते दोन टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा आहे. सर्व राज्यांमधील तपासणी नाके जीएसटीमुळे रद्द झाली आहेत. त्याचा परिणाम मालवाहतूक सुरळीत आणि कालबद्ध होण्यास मदत होईल. एवढेच नाही तर जीएसटीमुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल.

पत्र सूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या माध्यम शाळेस चांगला प्रतिसाद मिळाला. सीमा शुल्क विभागाचे सहायक आयुक्त गौरव जैन आणि हिमानी धमीजा यांनी जीएसटीवर तपशीलवार माहिती दिली तसेच पत्रकारांच्या सर्व समस्यांचे निराकरण केले. शेवटच्या टप्प्यात योगविषयक सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक डी वी विनोदकुमार यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तसेच वार्तालाप या माध्यम कार्यशाळेची संकल्पना स्पष्ट केली. तर, सहायक संचालक बालाजी प्रभूगावकर यांनी आभारप्रदर्शन केले.

Web Title: esakal news goa news panaji news GST

टॅग्स