कर्नाटकाचे माजी विधान परिषद अध्यक्ष रामभाऊ पोतदार यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

बेळगावात एपीएमसी स्थापन करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. बेळगाव तालुक्यात ऊस उत्पादनाला वाव देण्यासाठी बेळगावच्या आसपास साखर कारखाना असावा,हे त्यांचे स्वप्न होते. त्यातूनच काकतीजवळ साखर कारखाना प्रकल्प ११९१ मध्ये उदयास आला.

बेळगाव : बेळगावचे अजातशत्रू व्यक्तीमत्व, कर्नाटक विधान परिषदेचे माजी अध्यक्ष रामभाऊ पोतदार यांचे आज (शनिवार) वार्धक्याने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. आज सायंकाळी ४ वाजता शहापूर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

जनता दलाचे रामक्रष्ण हेगडे यांचे सरकार कर्नाटकात सत्तेवर असताना रामभाऊ विधान परिषद अध्यक्ष होते. जनता दलात राहूनही त्यांचे सर्व पक्षातील नेत्यांशी सलोख्याचे संबंध होते. 

बेळगावात एपीएमसी स्थापन करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. बेळगाव तालुक्यात ऊस उत्पादनाला वाव देण्यासाठी बेळगावच्या आसपास साखर कारखाना असावा,हे त्यांचे स्वप्न होते. त्यातूनच काकतीजवळ साखर कारखाना प्रकल्प ११९१ मध्ये उदयास आला पण सरकारी अनास्थेमुळे आजही हा कारखाना गाळप स्थितीपर्यंत पोचलेला नाही. 
 

Web Title: esakal news karnataka Karnataka leader rambhau potdar passes away

टॅग्स