विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मूल्यांकनासाठी ‘परख’ ची स्थापना

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 12 September 2020

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मूल्यांकन पद्धतीत सुधारणा करण्यासाठी ‘परख’ हे राष्ट्रीय केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. केवळ अभ्यासात नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ज्ञानाचे आकलन होईल, असे समीक्षा व विश्‍लेषण या केंद्राद्वारे केले जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण -२०२० हे २१ व्या शतकातील नव-भारताला नवी दिशा देईल, असाही त्यांनी विश्‍वास व्यक्त केला.

नवी दिल्ली - विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मूल्यांकन पद्धतीत सुधारणा करण्यासाठी ‘परख’ हे राष्ट्रीय केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. केवळ अभ्यासात नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ज्ञानाचे आकलन होईल, असे समीक्षा व विश्‍लेषण या केंद्राद्वारे केले जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण -२०२० हे २१ व्या शतकातील नव-भारताला नवी दिशा देईल, असाही त्यांनी विश्‍वास व्यक्त केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘एकविसाव्या शतकातील शालेय शिक्षण’ या विषयावरील संमेलनात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलताना मोदी म्हणाले, की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नव्या भारताच्या आकांक्षा, अपेक्षा व आवश्‍यकता पूर्ण करण्याचे सशक्त माध्यम बनेल .हे धोरण ४-५ वर्षांच्या मेहनतीचे फळ आहे. नवीन शिक्षण धोरणाबाबत माय-जीओव्ही पोर्टलवर केवळ एका आठवड्यात १५ लाखांहून जास्त सूचना आल्या. मुलांना घराबाहेर निघण्याचा पहिला अनुभव शालेय किंवा पूर्वप्राथमिक शिक्षण देते. विद्यार्थ्यांना वातावरणानुसार शिक्षण दिले तरच त्यांना व्यावहारिक ज्ञान मिळेल.

'लेटरबॉम्ब'नंतर काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल; आझाद यांचे पद घेतले काढून

मागील तीन दशकांमध्ये समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात व्यापक बदल झाले आहेत. मात्र, ज्या मार्गावरून चालताना देशाच्या भविष्याची दिशा मिळते त्या शिक्षणक्षेत्राचा गाडा जुन्याच रस्त्यावरून ओढला जात होता. त्यात बदल होणे ही काळाची गरज होती व तीच सरकारने पूर्ण केली आहे. 
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Establishment of parakh for academic assessment of students