Alcohol Prices to Drop in India
esakal
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण विदेशी दारू स्वस्त होणार आहे. युरोपमधून येणाऱ्या व्हिस्की, बिअर आणि वाईन दर कमी होतील, अशी माहिती आहे. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात मुक्त व्यापार करार झाला आहे. या करारामुळेच युरोपमधून येणाऱ्या दारुवरील आयात शुल्कात कपात करण्यात आली आहे.
सध्या, भारतात आयात केलेल्या वाइनवर १५० टक्के इतका मोठा आयात कर आकारला जातो. मात्र नव्या करारानुसार, हा कर कमी केला जाणार आहे. या करारानंतर विदेशी दारूच्या किमती कमी होणार असल्यामुळे मद्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.