युरोपमध्ये कोरोनामुळे 7 लाख मृत्यू होण्याची भीती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना

युरोपमध्ये कोरोनामुळे 7 लाख मृत्यू होण्याची भीती

ब्रिटन : युरोपमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. झपाट्याने वाढणाऱ्या प्रकरणांनी जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि तज्ञांना आश्चर्यचकित केले आहे. दरम्यान, युरोपमधील रूग्णसंख्या अशाच पद्धतीने वाढत राहिल्यास आगामी मार्च 2022 पर्यंत सात लाख नागरिकांना आपला जीन गमवावा लागू शकतो. युरोप महाद्विपातील 53 देशांमध्ये येत्या काही महिन्यांत कोरोना विषाणुमुळे मार्च 2022 पर्यंत आणखी सात लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

युरोपमधील वाढत्या कोरोना प्रकरणांमुळे ऑस्ट्रियामध्ये पुन्हा एकदा लॉकडाउन लावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे फ्रान्स, जर्मनी आणि ग्रीससह अन्यदेशांमध्ये आगामी काळात नागरिकांचे संपूर्ण लसीकरण करण्यावर भर दिला जाऊ शकतो. मात्र, अनेक देशांनी करण्यात येणाऱ्या नवीन उपाययोजनांविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला आहे. तसेच आंशिक लॉकडाऊनमुळे नेदरलँडमध्ये दंगली घडण्याची प्रकरणे समोर आली आहेत.

हेही वाचा: मुलांचं कोरोना लसीकरण आणि बूस्टर डोसबाबत लवकरच निर्णय?

युरोपमधील मृत्यू होण्यामागचे मुख्य कारण कोरोना असल्याचे मत जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या मूल्यांकनात म्हटले आहे. सध्याच्या एकूण परिस्थितीचा विचार करता पुढील वर्षीच्या वसंत ऋतूपर्यंत एकत्रितपणे नोंदविलेले मृत्यूचे प्रमाण 2.2 दशलक्षांपेक्षा जास्त असू शकते, अशीदेखील भीती जागतिक आरोग्य संघटनेकडून मंगळवारी व्यक्त करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या कोविड संबंधित मृत्यूंची संख्या दिवसाला दुप्पट होऊन 4,200 झाली असल्याचेही आहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. अलीकडेच एकट्या रशियामध्ये, दररोज मृत्यूमुखी पडणाऱ्या नागरिकांची संख्या 1,200 वर पोहोचली आहे. मोठ्या संख्येने लसीकरण न केलेले नागरिक आणि काही देशांमध्ये डेल्टाचा प्रसार हे युरोपातील मुख्य कारण असल्याचे मत WHO ने व्यक्त केले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे युरोपचे संचालक डॉ. हंस क्लुगे यांनी ज्या नागरिकांनी अद्यापपर्यंत लसीकरण केलेले नाही त्यांना लस घेण्याचे आवाहन केले आहे. यामुळे आगामी काळात जीवितहानी टाळण्यास आपल्याला मदत होईल. दरम्यान, युरोपच्या बर्‍याच भागांत अधिक काळापर्यंत निर्बंध लावण्यात आले होते. तर, जुलैच्या मध्यात इंग्लंडमध्ये पूर्णपणे अनलॉक करण्यात आले. मात्र युरोपच्या काही भागात शरद ऋतूपर्यंत निर्बंध शिथिल करण्यात आलेले नव्हते. याचे मुख्य कारण अल्फा आणि त्यानंतर डेल्टा व्हेरिएंटचा बसलेला मोठा फटका होय.

loading image
go to top